Source: divyamarathi.bhaskar.com
Posted by: Rajnesh on 21-05-2016 07:59,
Type: Other , Zone: Western Railway)
पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या सरकारला दाेन वर्षे पूर्ण हाेत अाहेत. त्या निमित्ताने प्रभू यांनी गेल्या दाेन वर्षांचा लेखाजाेखा मांडला. माध्यमांशी बाेलताना ते म्हणाले, गेल्या दाेन वर्षांत केलेली कामे सांगण्यासारखी खूप अाहेत, परंतु ती ठाेस अशी नाहीत, ‘प्रगती के दाे साल; भारतीय रेल्वे बेमिसाल’ असे अावर्जून म्हणता येर्इल. मी अल्पसमाधानी नाही. त्यामुळे माझ्याकडे रेल्वेची जबाबदारी अाली तेव्हाच पुढच्या पाच वर्षांत देशामध्ये रेल्वे बदललेली कशी असेल, याबाबत मी एक ब्लू प्रिंट तयार केली हाेती. याअाधी कधी झाले नाहीत एवढे बदल २०१९ नंतर दिसायला लागतील. अाहे त्याच रेल्वे रुळांवरून अधिक गतीने रेल्वे धावतील. सर्वच प्रवाशांचा रेल्वे भार उचलू शकत नाही त्याचे दु:ख मला अाहे; परंतु त्यासाठीही मार्ग काढला अाहे. ज्या रेल्वेला गर्दी अाहे तिथे तीन ते चार दीनदयाळ डबे जाेडण्यात येणार अाहेत. हे डबेसुद्धा वेगळे व अाकर्षक असतील. रेल्वेची गती वाढविण्यास अाम्ही प्राधान्य देत अाहाेत; परंतु त्यासाठी नवीन रूळ उभारणी करणे अवघड बाब अाहे. दिल्ली ते अाग्रापर्यंत गतिमान एक्स्प्रेस सुरू केली अाहे. त्याचे भाडे अधिक असले तरी लाेक या रेल्वेेने प्रवास करतात, त्यांचा वेळही वाचताे. त्याच धर्तीवर अाहे त्याच रेल्वे ट्रॅकवर गतिमानपेक्षाही वेगवान गाडी तेजस महाराष्ट्रात धावताना दिसणार अाहे. पुण्याहून मुंबर्इला विमानाने जाताना घरून निघतानापासून जेवढा वेळ लागताे त्याहीपेक्षा कमी वेळेत तेजस रेल्वे पाेहोचवणार अाहे. ही गाडी अारामदायी असणार अाहे. तीन ते चार तासांपर्यंतचा टप्पा असलेल्या महत्त्वाच्या शहरांसाठी ही गाडी अाॅगस्टपासून सुरू करत अाहाेत. त्यानंतर लांबपल्ल्यासाठीही ही गाडी सुरू हाेर्इल. तेजसप्रमाणेच उदय ही डबल डेकर रात्रभरात पाेहोचविणारी, हमसफर राजधानीपेक्षा वेगवान असणारी अाणि अंत्याेदय या चार गाड्या अाॅगस्टपासूनच सुरू करण्याचा मानसही प्रभू यांनी व्यक्त केला.