Source: www.esakal.com
Posted by: दीप on 06-07-2016 21:54,
Type: Other , Zone: West Central Railway)
मध्य रेल्वेच्या मार्गावरून धावणाऱ्या मंगला एक्स्प्रेससाठी नाशिकहून अतिशय कमी कोटा होता. या कोट्यात वाढ करावी, यासाठी सप्टेंबर 2015 पासून खासदार हेमंत गोडसे यांच्यामार्फत केरळी बांधवांचा पाठपुरावा सुरू होता. अखेर मध्य रेल्वेने नाशिककरांच्या मागणीला हिरवा कंदील दाखविला आहे. मंगला एक्स्प्रेससाठी यापूर्वी द्वितीय श्रेणी वातानुकूलितचा चार जागांचा कोटा होता. तो आता 40 झाला आहे. तृतीय श्रेणी वातानुकूलितचा पूर्वी सहा जागांचा कोटा होता. तो आता 48 जागांचा झाला आहे. स्लिपर कोचसाठी पूर्वीचा 30 जागांचा कोटा 130 झाला आहे.