Source: www.pudhari.com
Posted by: Guest on 02-06-2016 04:35,
Type: New/Special Trains , Zone: West Central Railway)
महाजन यांच्या पुढाकारामुळे मध्य प्रदेशातील इंदूर ते केरळमधील कोचुवेली दरम्यान धावणारी सुपरफास्ट गाडी (09310/09) गेल्या वर्षीपासून सुविधा स्पेशल गाडी म्हणून चालवली जात आहे. यंदाच्या हंगामातही ही गाडी सुरू आहे. या गाडीच्या नियोजित फेर्या संपल्या असल्याने तिला लाभत असलेला प्रतिसाद लक्षात घेऊन दि. 7 जून रोजीदेखील ही गाडी सोडण्यात येणार आहे. ही गाडी इंदूरहून रात्री 9 वा. 5 मिनिटांनी सुटेल आणि तिसर्या दिवशी सायंकाळी 6.30 वाजता ती कोचुवेलीला पोहचेल. दि. 10 जून रोजी ही गाडी कोचुवेलीहून सकाळी 11 वाजता परतीच्या प्रवासाला निघेल आणि तिसर्या दिवशी ती सायंकाळी 6 वा. 15 मिनिटांनी इंदूरला पोहचले.
सुविधा स्पेशल म्हणून धावणारी ही गाडी देवास, उज्जैन, नागदा, रतलाम, दाहो, वडोदरा, सुरत, वापी, बाईसर, विरारा, वसई रोड, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, थीवी, मडगावमार्गे केरळमधील कोचुवेलीला जाईल.